रथ मिरवणुकीच्या मार्गावर उद्या 'नो व्हेईकल झोन'; 'हे' असतील पर्याय

रथ मिरवणुकीच्या मार्गावर उद्या 'नो व्हेईकल झोन'; 'हे' असतील पर्याय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रामरथ (Ramrath) व गरुड रथाच्या (Garudrath) पार्श्वभूमीवर रथाच्या मार्गात सर्वच वाहनांना (Vehicles) प्रवेश बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) दिले आहे.....

याबाबत पोलीस आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात रथ मिरवणुकीमुळे वाहतूक मार्गातील (transport route) बदल सुचवले आहेत. तसेच रथाच्या मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहनांना सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहे.

उद्या दुपारी तीन वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत रथाच्या मार्गात सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले असून सर्व वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक मार्गातील सुचवलेले बदल

  • काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी मार्ग मेनरोड कडे जाणाऱ्या वाहनांनी पंचवटी कारंजा मार्गे इतरत्र जावे.

  • काट्या मारुती संतोष टी पोइंत द्वारका सर्कल सारडा सर्कल मार्गे इतरत्र जावे.

  • बादशाही कॉर्नर कडील वाहने शालीमार, गंजमाळ,सीबीएस मार्गे ये जा करतील. .

Related Stories

No stories found.