जिल्हा परिषदेत 'नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री'

जिल्हा परिषदेत 'नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री'

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ या मोहिमेनंतर आता ‘ नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ No vaccine, no entry ही मोहीम जिल्हा परिषद Nashik Zilla Parishad प्रशासनाने हाती घेतली असून त्याची अंमलबजावणी शुक्रवार (दि.24)पासून करण्यास प्रारंभ करण्यात आला.

सोमवार (दि.27) पासून करोनाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या सेवकांनाच जिल्हा परिषदेत प्रवेश मिळेल.अशा सेवकांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. त्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे सेवकांचेही धाबे दणाणले आहे. सर्व विभागप्रमुखांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने ‘नो व्हॅक्सिन, नो एन्ट्री’ या संकल्पनेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.याबरोबरच करोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस ज्या सेवकांनी घेतलेले नाही,अशा सेवकांचे पुढील महिन्यातील वेतन रोखण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com