Nashik News : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच; पालकमंत्री भुसेंसोबतची बैठक निष्फळ

 Nashik News : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच; पालकमंत्री भुसेंसोबतची बैठक निष्फळ

नाशिक | Nashik

केंद्र सरकारने (Central Government) काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर वाढत असतांना निर्यात मुल्यात ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील कांदा उत्पादक संघटनांसह अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी (Onion Farmers) आक्रमक होत सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. तसेच यावेळी जिल्ह्यातील (District) अनेक संघटनांनी बंद पुकारला होता. त्यावेळी संघटनांच्या या बंदला अप्रत्यक्षपणे व्यापाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता.

 Nashik News : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच; पालकमंत्री भुसेंसोबतची बैठक निष्फळ
Nashik News : पाण्यासाठी देवळा पूर्व भागातील नागरिक एकवटले

त्यानंतर केंद्र सरकारने नाफेडच्या (NAFED) मार्फत २४२० रुपये दराने कांदा खरेदीची घोषणा केली होती. परंतु, सरकारच्या या निणर्यावर कांदा व्यापारी समाधानी नव्हते. यानंतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महिनाभरापूर्वी कांदा व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत (District Collector) बैठक झाली. पण या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांनी काल बुधवार (दि.२०) पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव (Onion Auction) संपूर्णपणे ठप्प आहेत.

 Nashik News : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच; पालकमंत्री भुसेंसोबतची बैठक निष्फळ
Nashik Bribe News : चार हजारांची लाच घेतांना महिला अधिकाऱ्यास अटक

तसेच काल पणन मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) एका खाजगी कामासाठी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) येवला येथे आले होते. त्यावेळी त्यांना माध्यमांनी कांदा व्यापाऱ्यांच्या संपाबाबत विचारले असता ऐन सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी (Traders) कांदा लिलाव (Onion Auction) बेमुदत बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य नसल्याचे म्हटले होते. तसेच येत्या २६ तारखेला व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठरले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने मंत्री सत्तार यांनी पणन आयुक्त, सहकार आयुक्त आणि नाशिक जिल्हाधिकारी (Collector) यांना बंदमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने आणि गाळे जप्त करण्याचे आदेश दिले होते.

त्याअनुषंगाने आज कांदा प्रश्नावर पालकमंत्री दादा भुसे यांनी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांना तोडगा काढण्यात अपयश आल्याची माहिती समोर आली आहे.

 Nashik News : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच; पालकमंत्री भुसेंसोबतची बैठक निष्फळ
Rahul Gandhi : राहुल गांधी बनले 'कुली' नंबर ७५६; 'त्या' व्हिडीओची होतेय सर्वत्र चर्चा

दरम्यान, या बैठकीत बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले की, येत्या २६ तारखेला मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करावा, असे भुसे यांनी सांगितले. मात्र, व्यापाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत कांदा लिलाव सुरू होणार नाही, आणि मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांना तोडगा काढण्यात अपयश आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

 Nashik News : कांदा व्यापाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच; पालकमंत्री भुसेंसोबतची बैठक निष्फळ
Abdul Sattar : कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा; मंत्री सत्तारांचे पणन आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com