ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय पक्ष नको : ठाकरे

ग्रामपंचायत निवडणूकीत राजकीय पक्ष नको : ठाकरे

तांदळाचीबारी । Tandalachi Bari | Dindori

ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकीत (election) राजकीय पक्षांनी (Political parties) आपल्या वर्चस्वासाठी राजकारण (politics) कालवू नये.

गाव एक नातं आहे. या नात्यात गटबाजी करून विकास खुंटता कामा नये, पक्षाचा गाडा गण-गटात हाका परंतु ग्रामपंचायतीमध्ये नको, असे प्रतिपादन उंबरपाडा (क) येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन अशोक ठाकरे (Chetan Ashok Thackeray) यांनी केले.

पेठ तालुक्यात (peth taluka) नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर (Elections announced) झाल्याने सर्वच राजकिय पक्षातील इच्छुक उमेदवार पक्षहित घेऊन पक्षाचा सरपंच व्हावा म्हणून गावाच्या लोकमताकडे धाव घेत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणुक (election) ही राजकीय पक्षातील नेत्यांनी कालवाकालव केली की गावाच्या नात्याची नाळ तुटते आणि तिथे सुरू होते ती राजकीय गटबाजी.

उमेदवारीच्या आशेने राजकीय पक्षातील पुढारी आणि नेते विविध राजकीय समीकरणं सत्तेचा गावगाडा चालण्यासाठी वापरतात त्यामुळे ग्रामस्थांचा एकोप्यात आणि आपुलकी फुट पडते आणि विकास खुंटतो. गावाच्या सामान्य नागरिकाला सत्तेची आशा नसते.

मात्र सरपंचाने शासनाच्या माध्यमातून मुलभूत सुविधा द्याव्यात अशी आत्मिक इच्छा असते. बढक्या पुढार्‍यांनी समाधान बाळगुन युवा पिढीला विकासात्मक राजकारण शिकवावं आणि ग्रामपंचायत निवडणुकीत संधी द्यावी, असे ठाकरे यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com