'नो नायलॉन मांजा'साठी नाशिककर एकवटले

सिग्नल, वर्दळीच्या ठिकाणी होतेय जनजागृती
'नो नायलॉन मांजा'साठी नाशिककर एकवटले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नायलॉन मांजा विक्रीवर न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. (Nylon Manja ban by Court in nashik) या मांजामुळे शहरात अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांचा गळा चिरला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यापार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पर्यावरणप्रेमी चंद्रकिशोर पाटील (Chandrakishor patil) यांनी नाविन्यपूर्ण पद्धतीने 'नो नायलॉन मांजा' (no naylon manja) या अभियानाला सुरवात केली आहे....

यासाठी त्यांनी पतंगाची शिल्पाकृती (kite बनवली आहे. त्यावर नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या व्यक्तीचे आणि पक्ष्यांचे फोटो वापरले आहेत. हे शिल्प नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या अभियानाअंतर्गत पाटील आणि त्यांचे सहकारी शहरातील विविध चौक आणि महत्वाच्या सिग्नलवर जनजागृती करत आहेत. अभियानाच्या दुसऱ्या दिवशी सिटी सेंटर मॉलजवळील सिग्नलवर शिल्पकृती आणि पोस्टर्स घेऊन जनजागृती करत नागरिकांशी संवाद साधला.

नायलॉन मांजामुळे अपघातांमधून येणारे कायमस्वरुपी अपंगत्व येण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा मांजा पक्ष्यांना, प्राण्यांना जखमी करण्यासही कारणीभूत ठरतो. अनेकवेळा यात अडकून मुके प्राणी आणि पक्षी मृत्युमुखी पडत आहेत.

या मांजाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे तरीही छुप्या पद्धतीने शहरात मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची विक्री होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दंडात्मक कारवाईसोबतच नागरिकांचे आणि खासकरून तरुण पिढी आणि लहान मुलांचे प्रबोधन होण्याची गरज आहे. याच विचारातून ही जनजागृती मोहीम सुरु आहे.

यावेळी दोनच महिन्यापूर्वी मांजामुळे गळा कापून जखमी झालेले नागरिक आनंद सोनवणे यांनी टीमला भेट देऊन या अभियानासाठी आभार मानले.

या मोहिमेत तिडके नगर येथील जेष्ठ नागरिक अनंत सगंमनेरकर,सुरेश नाफडे,नरेंद्र दशपुते, माधुरी गडाख (भोसला स्कुल शिक्षिका), झटका संस्थेचे रोशन केदार, अभिव्यक्ती संस्थेच्या मयुरी धुमाळ आणि नाशिक एअरचे मोहसीन पठाण यांनीही सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com