पिक कर्ज
पिक कर्ज
नाशिक

कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय नको : चव्हाण

Abhay Puntambekar

डांगसौंदाणे । वार्ताहर

जिल्हा बँकेला नुकताच राज्य सरकारकडून ८७० कोटी रुपयांचा कर्जमाफीचा हप्ता प्राप्त झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांमधे समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र काही अटी- शर्तीमुळे नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना हे कर्ज वाटप न करता ज्या शेतकर्‍यांना महात्मा फुले कर्जमाफी योजनेत लाभ मिळाला आहे अशाच शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यात येणार असल्याने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया माजी आ. दीपिका चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा बँकेच्या एकूण ग्राहकांपैकी १ लाखाहुन अधिक शेतकरी हे नियमित कर्ज फेडणारे आहेत. कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांना पिककर्ज हे मिळालेच पाहिजे मात्र जे नियमित आहेत त्यांना ही कर्ज मिळाले तर अशा शेतकर्‍यांवर होणारा अन्याय थांबवता येईल अणि नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांवरील अन्याय ही थांबवता येणार आहे.

याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांसह नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी आ. चव्हाण यांनी दिली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com