Photo Gallery : दुपारी १२ वाजेनंतर नाशिक पुन्हा सुनसान

सकाळी व्यावसायिकांची काहीशी गजबज; दुपारनंतर कारवाईला सुरुवात
Photo Gallery : दुपारी १२ वाजेनंतर नाशिक पुन्हा सुनसान

नाशिक | प्रतिनिधी

अत्यावश्यक सेवांना सकाळच्या सत्रात परवानगी दिल्यामुळे सकाळपासून काहीसे गजबजलेले रस्ते दुपारी १२ वाजेनंतर पूर्णपणे लॉकडाऊन झाले होते.

नाशिकमधील दुध बाजार, भद्रकाली, मेनरोड, शालीमार, सीबीएस, नवीन सीबीएस, रविवार कारंजा, मालेगाव स्टन्ड परिसर, पंचवटी कारंजा, अशोकस्तंभ या भागातील रस्ते ओस पडले असून याठिकाणी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नाशिक पोलिसांनी दुपारनंतर कारवाईला पुन्हा सुरुवात केलेली होती. शहरात येणाऱ्या प्रत्येक दुचाकी, चारचाकीची कसून चौकशी ठिकठिकाणी होताना दिसून आली. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेकांनी कारवाईस्थळापासून पळ काढला.

यावेळी नको ते कारण सांगून शहरात प्रवेश करणाऱ्या अनेक तरुणांना पोलिसांनी लाठीचा प्रसाददेखील दिला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com