गुड न्युज : नाशिक २४ तासात एकाही रूग्णाचा मृत्यू नाही

करोना मुक्तीचे प्रमाण ९४.१५ टक्क्यांवर
गुड न्युज : नाशिक २४ तासात एकाही रूग्णाचा मृत्यू नाही

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने घटत असून करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेली सहा महिन्यांत आज प्रथमच दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

तर मागील चोवीस तासात केवळ 244 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा अधिक 418 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

यामुळे करोनावर मात करणारांचा आकडा 88 हजार 424 वर पोहचला आहे. हे प्रमाण 94.15 टक्के इतके आहे.

मागील वीस दिवसात जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह येणारांची संख्या घटत चालली आहे. तर करोनामुक्त होणारांचे प्रमाण वाढत आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात केवळ 244 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 154 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 62 हजार 130 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 84 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 26 हजार 916 झाला आहे. मालेगावत दिवसभरात 4 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर जिल्हाबाह्य दोन आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 4 हजार 151 झाला आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 718 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 418 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 88 हजार 424 झाला आहे.

करोनामृत्यूमध्येही मोठी घट झाली असून आज दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 670 वर स्थिर आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा घटत चालला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 93,915

* नाशिक : 62,130

* मालेगाव : 4,151

* उर्वरित जिल्हा : 26,916

* जिल्हा बाह्य : 718

* एकूण मृत्यू : 1,670

* करोनामुक्त : 88,424

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com