पाडळी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

पाडळी सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

ठाणगाव । वार्ताहर Thangaon

परिसरातील पाडळी Padali येथील सरपंच sarpanch सुरेखा सुधीर रेवगडे यांच्यावरील अविश्वास ठराव No-confidence resolution 6 विरुध्द एक मताने मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी तहसीलदार राहूल कोताडे होते.

रेवगडे यांच्या विरोधात त्या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, स्वतःचे नाव टाकून त्यांनी कूकरचे वाटप केले यासह अनेक आरोप 7 सदस्यांनी 4 ऑक्टोबर रोजी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर विचार करण्यासाठी तहसीलदारांनी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावली होती.

उपस्थित सदस्यांना हात उंच करून मतदान करण्याची सूचना देण्यात आली. त्यात अविश्वास ठरावाच्या बाजूने सहा तर सरपंचाच्या बाजूने एक मतदान झाले. एक सदस्य गैरहजर होते तर एक सदस्य तटस्थ राहीले. सहा विरुद्ध एक मताने या ठराव मंजूर करण्यात आल्याची घोषणा त्यानंतर तहसीलदारांनी केली.

सन ते या कालावधी करता निश्चित केलेले पद आरक्षणानुसार सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी निश्चित करण्यात आले आहे. यावेळी धनंजय रेवगडे , चंद्रभान रेवगडे, जनाबाई संजय रेवगडे, सुभाष जाधव, सुमन संजय रेवगडे, शीला अनिल शिंदे, सुरेखा संजय बोगिर हे सदस्य उपस्थित होते तर ललिता अरुण कडाळे गैरहजर होत्या. ग्रामसेविका सारिका बिडवे, तलाठी उषा कोलदांडे यांनी तहसीलदारांना सभेच्या कामात सहाय्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com