इगतपुरी : शवविच्छेदनासाठी अद्याप सहाय्यकाची नेमणूक नाही

ग्रामीण रुग्णालयाची अवस्था
इगतपुरी ग्रामीण रुग्णालय
इगतपुरी ग्रामीण रुग्णालय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कोविड -१९ चा उद्रेक झाल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. कोविड -१९ चे रुग्ण एकीकडे वाढत आहेत, तर इतर रुग्णांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. दुसरीकडे इगतपुरी नागरिकांना अतिशय वेगळ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्या करिता अद्याप सहाय्यकाची नियुक्ती झालेली नाही.

मागील वर्षी शवविच्छेदन करणारी व्यक्ती मरण पावली, परंतु त्याच्या मृत्यूनंतर सहाय्यकाची नेमणूक झाली नाही. या दरम्यानचे शवविच्छेदनाचे काम घोटी ग्रामीण रुग्णालयातील व्यक्ती करत असे. परंतु त्याची प्रकृती खालावल्याने आणि कोविड -१९ चा प्रभाव इगतपुरी तालुक्यात वाढत असल्याने इगतपुरी ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यास असमर्थ आहे.

गेल्या आठवड्यात एका तरुणाने आत्महत्या केली तेव्हा हा विषय प्रकाशझोतात आला. नगर परिषद तलावामध्ये तरुणांनी आत्महत्या केली. दि.२७ जून रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास त्याला रुग्णालयात आणले गेले. पीएम करण्यासाठी कोणीच नसल्यामुळे दुसर्‍या दिवशी साडेबारापर्यंत मृतदेह रुग्णालयात पडून होता. जनतेच्या रोषानंतर घोटी ग्रामीण रुग्णालयामधील कर्मचार्‍यांना घाईगडबडीत आणले गेले.

हा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिकांनी इगतपुरी आरएचच्या वैद्यकीय अधिका्यांची मागणी केली आहे. इगतपुरीचे आमदार खोसकर यांनाही लोकांनी तातडीने काही पावले उचलण्याची विनंती केली आहे. सुमारे १० दिवस उलटून गेले परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

परिस्थितीबद्दल पूर्ण माहिती आहे. लोकांनी माझ्याकडेही या विषयाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यास एक पत्र तयार करीत आहे. बुधवारी त्यांना भेटून नियुक्तीसाठी विनंती करू. "

- आमदार खोसकर, इगतपुरी मतदारसंघ

"इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करिता नेमणूक केलेली नाही हे खरे आहे. घोटी ग्रामीण रूग्णालयाच्या कर्मचार्‍यांकडून शवविच्छेदन केले आहे. शवविच्छेदन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांना विनंती केली आहे.

- डॉ. स्वरूपा ठाकूर देवरे, वैद्यकीय अधिकारी, इगतपुरी ग्रामीण रुग्णालय

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com