करवसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

थकबाकीदारांच्या घरासमोर वाजवणार ढोल
करवसुलीसाठी मनपाची धडक मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेला ( NMC )शहरात विविध विकास कामे करण्यासाठी पैशांची गरज लागते तर मनपाचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणजे घरपट्टी ( House Tax )व पाणीपट्टी ( Water Bills) आहे, मात्र मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात थकबाकी झाल्यामुळे महापालिका प्रशासन आता कर वसुलीसाठी कडक भूमिका घेणार असुन थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवण्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

मनपाच्या सहाही विभागासाठी ढोल वाजवण्याचा ठेकाही काढण्यात आला आहे. प्रत्येक विभागासाठी तीन लाख रुपये खर्च अपेक्षित असून सहा विभागासाठी अठरा लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. थकीत घरपट्टीची रक्कम 61 कोटी तर पाणीपट्टी थकबाकी 35 कोटी आहे. थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यासाठी महापालिका लवकरच मुहूर्त निवडणार असल्याचे वृत्त आहे.

मनपाचे घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष झाले होते. त्याचा फायदा घेत अनेकांनी बिल भरण्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे थकबाकीचा आकडा कोट्यवधीचा आहे. मनपा प्रशासन वेळोवेळी आवाहन करूनही थकबाकीदार भरणा करत नसल्याने महापालिकेने बड्या थकबाकीदारांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या घरासमोर ढोल वाजविण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com