उद्यापासून मनपाचे ‘ढोल’ वाजणार

उद्यापासून मनपाचे ‘ढोल’ वाजणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एक लाखापेक्षा जास्त थकबाकीदार असलेल्या व्यवसायिक तसेच घरगुती थकबाकीदारांकडे वसुली करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ढोल बजाव मोहीम ( Dhol Bajao Campaign by NMC )सुरू केली होती, मात्र मध्यंतरी दिवाळी व शनिवार, रविवार असल्याने मोहीम स्थगित करण्यात आली होती. मात्र आता सोमवारपासून पुन्हा महापालिकेचा ढोल वाजवणार आहे. आतापर्यंत ढोल वाजल्यामुळे 4 कोटी रुपये पेक्षा जास्त वसुली झालेली आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार ढोल बजाव मोहीम सुरू करण्यात आली होती.पहिल्या तीन दिवसांत सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत कर वसुली झाली होती. तिसर्‍या दिवशी नाशिक पश्चिम विभागात सर्वाधिक 27 लाख 28 हजार तर पंचवटी विभागात 14 लाख 18 हजार वसुली झाली होती.

दरम्यान दीपावली सणाच्या काळात महापालिकेने कडक वसुली मोहीम सुरू केल्यामुळे विविध राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्याचप्रमाणे अतिक्रमण मोहीम देखील जोमाने सुरू करण्यात येणार आहे. शहरातील मुख्य चौकांचे अतिक्रमण निर्मूलन संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुढाकार घेतला असून मागच्या आठवड्यात त्यांनी विविध ठिकाणी जाऊन स्वतः पाणी केली आहे तसेच ब्लॅक स्पॉट नष्ट करण्याबरोबरच नाशिक शहरमुक्त करण्यासाठी आयुक्त थेट मैदानात उतरले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com