मनपाच्या बससेवेला का होतोय विरोध?; वाचा सविस्तर

मनपाच्या बससेवेला का होतोय विरोध?; वाचा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या शहर बसेसची (Nashik NMC Bus) व्याप्ती सिन्नर (Sinnar), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पिंपळगाव (Pimpalgaon), वाडीव़र्‍हेपर्यंत (Wadiwarhe) वाढविण्यास एसटी कामगार सेनेने तीव्र विरोध केला आहे. परिवहन मंत्री व पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे...

नाशिक महापालिकेने दुसर्‍या टप्प्यात आपल्या परिवहन सेवेची व्याप्ती शहरासह चार तालुक्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेेतला आहे. अगोदर शहरातील नागरिकांना चांगली सेवा द्या. प्रत्येक वॉर्डात बसेस उपलब्ध करुन द्या.

शहरवासीयांनाच परिपूर्ण सेवा मिळेपर्यंत ग्रामीण भागात पाय पसरण्याचा विचारही करु नका, असे कामगार सेनेने म्हटले आहे. विभागीय सचीव सुभाष जाधव (Subhash Jadhav) यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नाशिक विभागातील (Nashik Division) सहा हजार कर्मचा़र्‍यांनी महापालिकेच्या धोरणास विरोध केला आहे.

कारण अगोदरच परिवहन महामंडळ अडचणीत आहे. दरमहा पगार देण्यास अडचणी येत आहेत. करोनामुळे (Corona) वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पिंपळगाव, दिंडोरी, कवडधरा, एसएमबीटी, वाडीवर्‍हे, गिरणारे या मार्गावर फेर्‍या सुरु करु नये.

त्यासाठी परिवहन महामंडळ सक्षम आहे, असे त्यांंनी म्हटले आहे. त्यामुळे दि. ७ ऑक्टोबरपासून सुरु होणार्‍या दुसर्‍या टप्प्याला विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com