नाशकातील मॉर्डन कॅफेवर मनपाचा हातोडा

नाशकातील मॉर्डन कॅफेवर मनपाचा हातोडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) वतीने मागील काही दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून गंगापूर रोडवरील (Gangapur Road) हॉटेल मॉर्डन कॅफेवर (Modern Cafe) आज मनपाने हातोडा चालवला...

याबाबत त्यांना नोटीस देण्यात आली होती, तरीही कारवाई करावी लागली. यामुळे त्यांच्याकडून एक लाख 38 हजार रुपयांची वसुलीदेखील करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त करुणा डहाळे (Karuna Dahale) यांनी दिली.

पुष्कर वैशंपायन (Pushkar Vaishampayan) हॉटेलचालकाचे नाव असून, गेल्या अनेक वर्षांपासून हे हॉटेल अनधिकृत इमारतीत सुरू होते. मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नाशिक विभागीय अधीकारी मयूर पाटील, सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर, पश्चिम विभागीय अधिकारी मोहन हरिश्चंद्र यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक, बांधकाम आणि नगररचना विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि 15 पोलिस सेवकांच्या मदतीने मोहीम राबविण्यात आली.

महापालिकेच्या पथकाने या हॉटेलचे पूर्ण अनधिकृत बांधकाम तोडले. यासाठी मनपाने कारवाईसाठी संबंधित अतिक्रमणधारकाकडून 1 लाख 38 हजार रुपये वसूल होणार आहे. कारवाईत 40 फूट बाय 40 फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला. दोन जेसीबी मशीनच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com