महापालिका कर्मचाऱ्यांना हवी १०० टक्के पदोन्नती

महापालिका कर्मचाऱ्यांना हवी १०० टक्के पदोन्नती

पंचवटी | वार्ताहर Panchvati

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १००% पदोन्नती मिळावी या मागणीचे निवेदन आमदार अँड. राहुल ढिकले (Adv Rahul Dhikale) यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त कैलास जाधव (NMC Kailas Jadhav) यांना देण्यात आले...

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सण २०१३ मध्ये पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यानंतर मागील आठ वर्षापासून कोणतीही पदोन्नती कमिटी बसलेली नाही. त्याचप्रमाणे मागील आठ वर्षात अनेक कर्मचारी हे सेवानिवृत्त व मयत झालेले असून नव्याने भरतीप्रक्रिया देखील राबविण्यात आली नाही.

मनपा क्षेत्रातील सर्व कर्मचारी यांनी सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kumbhamela व कोविड १९ (Covid 19) परिस्थिती तसेच स्मार्ट सिटी व स्वच्छता अभियान आदी बाबत चांगल्या प्रकारे काम करून नाशिक महानगरपालिकेला स्वच्छते बाबतीत अनेक पारितोषिक मिळवून दिली आहेत.

त्यांची ही बाब कौतुकास्पद असून त्यांनी पुढेही अशा पद्धतीने काम करत राहण्यासाठी नाशिक महानगरपालिका क्षेत्रात आस्थापना कर्मचारी संख्या कमी असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण लक्षात घेता त्यासाठी मनपाच्या विविध विभागात रिक्त असलेल्या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ज्या कर्मचाऱ्यांना पुढे पदोन्नती देणे शक्य आहे.

अशा सर्व कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर १००% पदोन्नती देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देतांना आमदार अँड.राहुल ढिकले यांच्या समवेत माजी उपमहापौर तथा नगरसेवक गुरमित बग्गा, खंडु बोडके, नरेश पाटील, मनपा कर्मचारी जितेंद्र चव्हाण, रामदास शिंदे, मदन पिंगळे, शरद बच्छाव, मनीष ओगले, राजु तांदळे, विनित बिडवई, संजय गायकवाड, संजय कोकणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com