...तर मनपा उभारणार ऑक्सीजन प्लँट

...तर मनपा उभारणार ऑक्सीजन प्लँट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसात करोना संसर्ग वाढत असुन यात गंभीर रुग्णांसाठी लागणारा ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडत आहे .

संबंधीत कंपन्यांकडुन पुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे भविष्यात ऑक्सीजनचा तुटवडा होऊ नये म्हणुन थेट महापालिकेकडुन ऑक्सीजन प्लँट सुरू करण्याचा विचार समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी यांसदर्भात संबंधीत अधिकार्‍यांना तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहे.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसात दररोज सातशे करोना रुग्ण समोर येत असुन मृतांचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासुन ऑक्सीजनचा पुरवठा होत नसल्याने गंभीर रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ऑक्सीजनचा पुरेशा पुरवठा होत नसुन यासंदर्भात मोठे ठेकेदार नियुक्तीसाठी निवीदेला दोनदा प्रतिसाद न मिळाल्यानंतर पुन्हा निवीदा प्रसिध्द करण्यात आली आहे.

गंभीर रुग्ण वाढत असतांना ऑक्सीजनचा तुटवड होऊ नये आणि यामुळे भविष्यात मृत्यु संख्या वाढली जाऊ नये म्हणुन अन्न औषध विभागाकडुन नुकतीच एक बैठक घेण्यात आली. यात ऑक्सीजन प्लँट महापालिकेकडुन उभारण्यात यावा अशी सुचना पुढे आली आहे. काही जेष्ठ नगरसेवकांनी देखील याचे समर्थन केले असुन करोना प्रश्नी येत्या 11 सप्टेंबर रोजी होणार्‍या स्थायी समितीच्या सभेत ऑक्सीजन प्लँट उभारणीवर चर्चा होणार आहे.

ऑक्सीजनची महापालिका रुग्णालयासह शहरातील खाजगी रुग्णालयांना देखील भविष्यात गरज लागणार असल्याने याचे नियोजन प्रशासनाकडुन सुरू झाले आहे. आयुक्त जाधव यांनी महापालिका आरोग्य वैद्यकिय व तांत्रिक विभाग प्रमुखांना ऑक्सीजन प्लँट उभारणीसंदर्भात तांत्रिक अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहे. यानुसार आता यासंदर्भात अभ्यात केला जाणार आहे.

रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता प्रशासनाकडुन सुरू झाल्या आहे. तांत्रिक अभ्यासात महापालिकेला हे शक्य असल्यास महापालिकेकडुन प्लँट उभा केला जाईल, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com