नाशिक महापालिका : 'असे' आहेत सहा प्रभागाचे विजयी उमेदवार

नाशिक महापालिका : 'असे' आहेत सहा प्रभागाचे विजयी उमेदवार

नाशिक | Nashik

महानगरपालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत नाशिक पूर्व मधून भाजपचे शाम बडोदे...

पंचवटी भाजपच्या शीतल मालोदे, सिडको प्रभागातून शिवसेनेचे चंदकांत खाडे ना. रोड च्या जयश्री खरजुल, पश्चिम च्या मनसे नगरसेविका वैशाली भोसले यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

नारोड प्रभाग समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या जयश्री खरजुल, रा.का चे जगदीश पवार, भा जप च्या मीरा हँडगे भाजपच्या डॉ सीमा ताजने हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. माघारी च्या वेळेत जगदीश पवार, मीरा हँडगे, डॉ.सीमा ताजने

यांनी माघार घेतल्याने सेनेच्या जयश्री खरजुल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.पश्चिम सभापती पदी वैशाली भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मनपाच्या प्रभाग समिती सभापती पदासाठी मनपा स्थायी समितीच्या सभागृहात ऑनलाइन पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणूका महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

नाशिक पूर्व प्रभाग समिती साठी भाजपचे शाम बडोदे, पंचवटी प्रभागातून भाजपच्या शीतल माळोदे, सिडको प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी चंद्रकांत खाडे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com