चार दिवसांनी नाशकात लसीकरण सुरु; केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी

चार दिवसांनी नाशकात लसीकरण सुरु; केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिकमधील लसीकरण थांबले होते. लसींचा पुरवठा थांबल्यामुळे अचानक महापालिकेकडून लसीकरण मोहीम शनिवार(दि १) पासून थांबविण्यात आली होती...

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्डचे जिल्ह्याला एक लाख ५९ हजार, तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे ६८ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. ही लस उपलब्ध झाल्याने चार दिवसांपासून बंद पडलेले लसीकरण आजपासून सुरू झाली आहे.

काल (दि ०५) रोजी नाशिक महापालिकेसाठी ८ हजार ५०० डोस प्राप्त झाले. त्यानंतर आज (दि ०५) दुपारपासून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला.

काल महापालिकेकडून लसीकरण सुरु करण्याबाबत घोषणा महापालिकेकडून सोशल मीडियात करण्यात आली होती.यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी नाशिकमधील महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासून तुंबळ गर्दी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com