नवीन नाशिक । Nashik

पाथर्डी फाटा येथे अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मनपातर्फे अतिक्रमण मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.

पाथर्डी फाटा ते नम्रता पेट्रोल पंप दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक महिन्यांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. याबाबतच्या तक्रारी मनपा नवीन नाशिक विभागीय कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या.

याची दखल घेत सहाय्यक आयुक्त तथा नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधिक्षक दशरथ भवर, प्रदीप जाधव, निलेश काळे, प्रकाश चव्हाण, प्रभाकर भोळे, मेघनाथ तिडके, राजेंद्र निगळ, देवराम शेळके, वाहनचालक नवनाथ तिदमे आदींच्या पथकाने कारवाई करत येथील अतिक्रमण हटवले.

या मोहिमेत व्यावसायिकांचे सामान तसेच एक मोठी गाडी देखील जमा करण्यात आली. यापुढे देखील ही कारवाई अशीच सुरु राहणार असून येथे अतिक्रमण न करण्याच्या सूचना डॉक्टर पाटील यांनी दिल्या.