नाशिक मनपा
नाशिक मनपा |digi
नाशिक

नाशिक मनपाची विविध पदांसाठी थेट मुलाखत प्रक्रिया सुरु

करोनाच्या पार्श्वभूमीवर मनपाची तयारी जोरात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांचा आकडा सहा हजारावर गेला असुन मृतांचा आकडा २१६ वर झाला आहे. तसेच संशयितांचा आकडा वाढता असुन वाढत्या संसर्गामुळे आता महापालिकेकडुन १८० डॉक्टर्स, २५० स्टाफ नर्स यासह इतर विविध पदांसाठी थेट मुलाखत प्रक्रियेत आजपासुन नाशिक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात प्र्रारंभ झाला आहे. दरम्यान यापुर्वी जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडुन डॉक्टरांच्या दोनदा झालेल्या भरतीस फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता तरी डॉक्टर पुढे येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

शासनाकडुन नाशिक शहरात वाढत असलेल्या करोना संसर्गाची गंभीर दखल घेतली जात असुन याच पार्श्वभूमीवर मंत्र्यांकडुन नाशिक संदर्भात आढावा घेण्यात आला. यात शहरात नवीन रुग्ण वाढीचा वेग हा पाऊणे दोनशेच्या आजपास असुन बाधीत रुग्णांमुळे संशयितांचा आकडा अलिकडे हजाराच्या वर गेल्यामुळे महापालिका प्रशासनाकडे डॉक्टरांसह इतर कर्मचार्‍यांची कमतरता निर्माण झाल्याच्या तक्रारी आहे.

आयसीएमआर कडुन येणार्‍या दिवसात रुग्णांची संख्या वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या एकुणच पार्श्वभूमीवर महापालिकेनेकडुन फक्त साथरोग (कोविड - १९ ) या करिता तीन महिन्याच्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडीकलच्या इतर जागांकरिता थेट मुलाखतीची प्रक्रिया आजपासुन सुरु केली आहे. यात नवीन डॉक्टरांनी व संबंधीतांनी सहभागी व्हावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेकडुन सुरू झालेल्या भरतीत फिजीशियन १०, भुलतज्ज्ञ १०, रेडीओलॉजीस्ट ५, वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस) ५०, मानसोपचार तज्ज्ञ २, मायक्रो बायोलॉजीस्ट २, आयुष वैद्यकिय अधिकारी (बीएमएएस) १००, स्टाफ नर्स २५०, प्रयोगशाळा तंत्रज्ञ २५, मिश्रक ६५, रेडीओग्राफर १०, आहार तज्ज्ञ ०२, समुपदेशक ३०, ए. एन. एम. १५० व मल्टी स्कील हेल्थ वर्कर अशाप्रकारे पदाचा समावेश आहे. आजपासुन सुरू झालेली ही भरती प्रक्रिया येत्या 29 जुलैपर्यत चालणार आहे.

मनपाला मिळणार इंटर्न मेडीकल ऑफीसर

नाशिक महानगरपालिका व स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या द अर्बन लर्निंग प्रोग्राम (ट्युलिप) अंतर्गत वैद्यकिय शिक्षण पुर्ण केलेल्या एमबीबीएस, बीएचएमएस व बीएससी नर्सिंग किंवा समकक्ष विद्यार्थ्यांना मेडीकल ऑफीसर इंटनशिपची संधी मिळणार आहे. यासाठी स्मार्ट सिटी कंपनीमार्फत ऑन लाईन भरतीची प्रकिया सुरू आहे. यात मेडीकल ऑफीसर इंटर्न (एमबीबीएस), आयुर्वेदीक मेडीकल ऑफीसर (बीएएमएस), नर्सिंग इंटर्न (बीएससी नर्सिंग किंवा समकक्ष) यांना महापालिकेच्या वैद्यकिय विभागात इंटर्नशिप करता येणार आहे. या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांनी ट्युलिपच्या पोर्टलवर जाऊन नोदणी करणे बंधनकारक आहे. या भरतीने करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकिय विभागाला तीन महिन्यासांठी 200 आरोग्य सेवक मिळणार मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com