मनपाची आठवडाभरात हजारो रुपयांची वसुली

मनपाची आठवडाभरात हजारो रुपयांची वसुली

नवीन नाशिक | Nashik

मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे (Municipal Solid Waste Management Department) आठवडाभर केलेल्या कारवाईत 87 हजार 800 रुपयांची दंडात्मक कारवाई (Punitive Actions) करण्यात आली.

सध्या करोनाची रुग्ण संख्या (Corona Positive Patients) जरी कमी असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे तसेच व्यवसायिकांनी देखील नियमांचे पालन करावे याकरिता मनपा घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

यामध्ये गेल्या आठवड्यात 18 जून ते 26 जून दरम्यान नंदिनी नदीकाठी (Nandini River) कचरा टाकल्याबद्दल 5 हजार रुपये, रस्ते मार्गावर घाण करणे यामध्ये दोन केसेस करून 5200 रुपये, मोकळ्या भूखंडावर बांधकाम मलबा टाकल्याबद्दल सात केसेस करून 6400 रुपये मास्क न वापरल्याबद्दल 70 कारवाई करून 35 हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे 6 केसेस करून सहा हजार रुपये, उघड्यावर लघुशंका करणे एक केस दोनशे रुपये ,नियमबाह्य अस्थापना सुरू ठेवणे बाबत सहा केसेस करून 30 हजार रुपये, अशी 93 केसेस करून 87 हजार 800 रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील ,विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक बी. आर. बागुल, रावसाहेब मते, राजेश बोरिसा, विनोद बोरिसा, राहुल गायकवाड, रावसाहेब रूपवते, विजय गोगलिया, दीपक लांडगे,अशोक दोंदे, अजय खळगे, राजु गायकर, अविनाश गांगुर्डे, संतोष बागुल, विजय जाधव, मिलिंद जगताप,सुनील पाटील आदींनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com