सातपूर परिसरातील 'या' भागात शनिवारी पाणी नाही

सातपूर परिसरातील 'या' भागात शनिवारी पाणी नाही

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या सातपुर पाणी पुरवठा विभागातील 1000 मी.मी. व्यासाची डी.आय. पाईपलाईनमध्ये अचानक गळती सुरु झालेली आहे. त्यामुळे या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. २९) सकाळी, दुपारी आणि सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे...

सदरील पाणी गळतीमुळे पाणी वाया जात असुन नागरीकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. तरी या पाईप लाईनची दुरुस्ती केली जाणार आहे.

शनिवार (दि 29) रोजी सकाळी 9 वाजेपासुन हाती घ्यावयाचे असल्याने म्हाडा कॉलनी, गोदावरी नगर, पाटील पार्क, जाधव संकुल, (खालचे व वरचे) मेदगे नगर, आशीर्वाद नगर, बंदावणे मळे परिसर, रिगालिया टॉवर इत्यादी परिसरात दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com