आज मनपाची ऑनलाईन महासभा

या विषयांवर होणार चर्चा
आज मनपाची ऑनलाईन महासभा

नाशिक | Nashik

आज (दि. 29) ऑनलाइन महासभाचे (Online Mahasabha) आयोजन करण्यात आले आहे. नोकर भरतीसह स्मार्ट सिटी तसेच बस सेवा (Smart City) आदी महत्त्वाच्या अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महासभा महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish kulkarni) यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

मागच्या महासभेत आवाज येत नसल्याने गोंधळात महासभा गुंडाळण्यात आली होती. महानगरपालिकेच्या कालिदास कलादालन (Kalidas Kalamandir) मध्ये ऑफलाइन पद्धतीने महासभा घेण्याची मागणी शिवसेनेने (Shivsena) केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com