पंचवटीत दीडशे धोकादायक वाडे, घरांना नोटिसा

जुन्या वाड्यांचा प्रश्न गंभीर
पंचवटीत दीडशे धोकादायक वाडे, घरांना नोटिसा
जुना वाडा

पंचवटी | Panchavti

पंचवटी परिसरात जुन्या आणि मोडकळीस आलेल्या १६६ घरमालकांना महापालिका पंचवटी विभागाने नोटीसा बजावल्या आहेत.

एकीकडे मनपा प्रशासन संबंधितांना नोटीस देत सोपस्कार पार पाडत आहे तर दुसरीकडे जीर्ण झालेल्या वाड्यांचे मालक कानाडोळा करीत आहेत. दरम्यान मोडकळीस आलेल्या वाडे इमारतीसह घरांचा पडका भाग संबंधितांनी स्वतःहुन उतरवुन घेण्याचे आवाहन पंचवटी मनपाचे विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी केले आहे .

वाढत्या करोना प्रसारामुळे महापालिकेचे आधिकारी आणि कर्मचारी विविध उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत तर, दुसरीकडे पावसाळ्याच्या तोंडावर जीर्ण वाड्यांच्या मालकांना नोटीसा बजावण्याचे सोपस्कार संबंधितांना पार पाडावे लागत आहे.

गत दोन वर्षात पंचवटीसह जुन्या नाशकात जीर्ण वाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते . त्यामुळे आधीच धास्तावलेल्या प्रशासनाने संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत गेल्या वर्षी पंचवटी विभागातील १८८ मालकांना धोकादायक वाडे उतरविण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या.

यंदा त्यात घट होऊन १६६ घरमालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. अनेक भाडेकरूंचे घरमालकाशी वादावादीनंतर थेट हाणामारीपर्यंत प्रकरणे गेली आहेत. अद्यापही अनेक भाडेकरूंना दहा वीस रूपयांपासून शंभरच्या आत घराचे भाडे आहे.

अशा परिस्थितीत संबंधित मालक घराची दुरूस्ती कशी करणार हाही प्रश्‍नच आहे. याशिवाय अनेक ठिकाणची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने भाडेवसुलीही थांबली आहे. ही बहुतांशी प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्यामुळे पालिका प्रशासन देखिल हतबल झाले आहे आणि याचाच फायदा काही भाडेकरू घेत आहे.

पावसाळ्यात पडक्या आणि मोडकळीस आलेल्या घरांसह जुन्या वाड्याचा भाग पडुन जीवीत किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने नोटीसा देऊनही वाडे मालकांनी मोडकळीस आलेला भाग स्वतःहुन उतरवुन न घेतल्यास दुर्दैवाने भर पावसाळ्यात हा भाग पडला तर उचलण्यासाठी पालिकेला जो आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. तो सर्व खर्च पालिका संबंधित वाडे मालकाच्या नावावर टाकून वसुली करण्यात येणार असल्याचे पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com