मनपा महापौरांनी दिली सर्व विषयांना मंजुरी

नाशिक मनपा ऑनलाईन महासभा संपन्न
नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक | Nashik

नाशिक महानगरपालिकेची महासभा ऑनलाइन पद्धतीने झाली. यामध्ये शहर अभियंता यांना निलंबित करण्याची नगरसेवकांनी मागणी केली.

स्मार्ट सिटी अंतर्गत मेन रोड, दहीपूल येथील रस्ता खोदला असल्याने याठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तसेच त्यासाठी मनपाचे कुठलेही नियोजन नसल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. नाशिक शहरात बऱ्याच ठिकाणी गॅस पाईपलाईनसाठी खोदण्याचे किती पैसे दिले आहेत.

याची माहिती मनपा अधिकारी देत नसल्याने शहर अभियंत्यांना निलंबित करा अशी मागणी नगरसेवकांनी केली व महासभा तहकूब करण्याची मागणी केल्याने विषय पत्रावरील सर्व विषयांना मंजुरी देत महापौर सतीश कुलकर्णी यांनी सभा गुंढाळली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com