नाशिकमधील खेळाडूंना मनपाचा सुखद धक्का

४९ खेळाडूंना सात लाखांची शिष्यवृत्ती
ब्रेंकिंग न्यूज
ब्रेंकिंग न्यूजब्रेंकिंग न्यूज

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेकडून आतापर्यंत ४९ विद्यार्थ्यांना जवळपास सात लाखांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. याबाबतची माहितीक्रीडा विभागाकडून देण्यात आली आहे...

अधिक माहिती अशी की, नाशिक मनपाच्या ४ जुलै २०१४ रोजी झालेल्या महासभेत ठरावानुसार १३४३ नुसार मंजूर झालेल्या क्रीडा धोरणांतर्गत नाशिक शहरातील आंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय, व राज्यस्तरावर प्राविण्य मिळविलेल्या ४९ खेळाडूंना रु .६,७१,००० इतक्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. ही रक्कम थेट खेळाडूंच्या बँक खात्यात वर्ग करून मनपाने खेळाडूंना आश्चर्याचा धक्काच दिला.

मनपाच्या क्रीडा धोरणात शहरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर उच्च कामगिरी करून शहराचे नाव उंचावतात. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने तरतूद करण्यात आली आहे.

या गुणवत्ता धारक खेळाडूंची निवड करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या १५ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या आदेशाने निवड समितीची रचना करण्यात आली आहे.

त्यात मनपा आयुक्त/ अतिरिक्त आयुक्त हे या निवड समितीचे अध्यक्ष असून, उप आयुक्त समाजकल्याण हे सदस्य सचिव तर मुख्य वित्त व लेखाधिकारी मुख्य लेखापरीक्षक मनपा क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी हे सदस्य आहेत.

या निवड समितीने सन २०१९-२० व २०२०-२१ या आर्थिक वर्षात ४९ खेळाडूंची निवड करून त्यांच्या बँक खात्यात रु ६.,७१,०००/- रक्कम वर्ग केली आहे.

मनपाने गुणवत्ताधारक खेळाडूंना आर्थिक मदत करून क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात केल्याबद्दल सर्व क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com