डॉ.जाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी नगरसेवकाचा गोंधळ

अहवाल अद्याप कागदावरच
डॉ.जाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी नगरसेवकाचा गोंधळ

नाशिक | Nashik

डॉ. जाकिर हुसेन रुग्णालय झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश येऊन आज एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला तरी त्या प्रकरणाचे काय झाले, यासह शहरातील विकास कामांवरुन शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी ऑनलाइन महासभेत ऑफलाईन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षकांनी सभागृहाच्या बाहेरच थांबल्यामुळे ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते.

महानगरपालिका संचालित डॉ. हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सीजन गळती झाल्यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला होता मृत्यूनंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

आणि हा चौकशी अहवाल महासभेसमोर सादर करण्यात येईल असे सांगितले होते, परंतु आज दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी या कालावधीत रुग्णालयात झालेल्या प्रकरणाचा अहवाल अद्याप पर्यंत सादर करण्यात आलेला नाही.

तसेच या प्रकरणात कोण दोषी आहे याबाबतची माहिती देखील वैद्यकीय विभागाकडून दिली जात नाही, याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड यांनी सोमवारी महानगरपालिकेच्या ऑनलाईन महासभेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना त्याच ठिकाणी सुरक्षारक्षकांनी अडवले आणि सभागृहात जाऊ दिले नाही. तसेच शहरातील विकास कामांबाबत कोणताही ठोस निर्णय होत नाही.

आणि विकास कामे पुर्ण केली जात नाही. शहरांमध्ये जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com