मनपाचे आता पोस्ट कोविड सेंटर्स

म्युकरमायकोसिससाठीही 'ऑपरेशन थिएटर'
मनपाचे आता पोस्ट कोविड सेंटर्स
USER


नाशिक | Nashik
म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव व सर्वसामान्यांना न परवडणारा त्यावरील उपचार खर्च लक्षात घेता अशा रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व नूतन बिटको रुग्णालयातच स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उभारले जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी मागणीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश वैद्यकीय अधिक्षकांना देण्यात आले आहेत.

त्याच प्रमाणे करोनारुग्ण बरा झाल्यानंतरही उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिससह अन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व फिवर क्लिनिकमध्ये अथवा प्रत्येक विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी एक पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याचे निर्देश आयुक्त कैलास जाधव यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांना दिले आहेत.

करोनाच्या पहिल्या लाटेपाठोपाठ दुसऱ्या लाटेने नाशकात थैमान घातले आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे सव्वा दोन लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी जवळपास दोन लाख आठ हजारांवर रुग्ण हे उपचाराअंती करोनामुक्त झाले आहेत.

मात्र करोनामुक्तीनंतरही काही आजारांमुळे लोकांना त्रास होत आहेत. त्यामुळे अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे.

महापालिकेचे फिवर क्लिनिक अथवा विभागनिहाय प्रत्येकी एक असे पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांना देण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये पोस्ट कोविड रुग्णांसाठी प्राथमिक माहिती दिली जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com