डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयुक्त तथा प्रशासक म्हणून स्विकारला पदभार

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयुक्त तथा प्रशासक म्हणून स्विकारला पदभार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (New nmc Commissioner Dr Chandrakant Khade) यांनी आयुक्त तथा प्रशासक म्हणून आज पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) आज महापालिकेत आले नव्हते. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे (Suresh Khade), प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील (Manoj Ghode patil) यांनी पदभार देण्याची कारवाई पूर्ण केली...

तसेच नवीन आयुक्तांचे स्वागत केले. शुक्रवारी (दि २२) सायंकाळी आयुक्त बदलीचे आदेश निघाल्यानंतर रमेश पवार (Ramesh Pawar) मुंबईला रवाना झाले. त्यांनी मात्र कोणालाही पदभार सुपूर्द केला नव्हता.

कायद्यानुसार, एकतर्फी कार्यभार देखील स्वीकारता येतो, त्यामुळे आज पदाचा स्वीकार नवनियुक्त आयुक्तांनी केला.पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यास नवनियुक्त आयुक्तांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com