स्मार्ट नाशिकच्या स्मार्ट बसेस पाहिल्यात का?; सीएनजी बससेवेची तांत्रिक ट्रायल यशस्वी

स्मार्ट नाशिकच्या स्मार्ट बसेस पाहिल्यात का?; सीएनजी बससेवेची तांत्रिक ट्रायल यशस्वी

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली बससेवा लवकरच सुरु होणार आहे. आज शहरात महापालिकेच्या स्मार्ट बसेसची रंगीत तालीम पार पडली. तांत्रिक बाबी तपासण्यासाठी आज तपोवन बसस्थानकातून काही बसेस वेगवेगळ्या मार्गावर धावल्या. अचानक अवतरलेल्या आकर्षक बसेस बघून नाशिककरांनी आनंद व्यक्त केला...

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, सक्षम वाहतूक पर्याय व प्रदूषणमुक्त शहर या बाबी लक्षात घेऊन महापालिकेने शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहरात आतापर्यंत २५० बसेस दाखल झाल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात या बसेसचे ट्रायल शहरात घेण्यात आले होते. यावेळी अनेक बसेसची नोंदणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्याची लगबग सुरु होती.

यानंतर एप्रिलमहिन्यात बससेवा सुरु करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही बससेवा सुरु होऊ शकली नव्हती. करोनाची दुसरी लाट ओसरली आहे. यामुळे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर बससेवाही सुरु होणार आहे. एकूण २५० बस सेवा देणार असल्याने शहराच्या कानाकोपऱ्यात ही बस पोहोचणार आहे. राज्य परिवहनकडून अवघ्या १२५ ते १३० बसेस शहरात सुरु होत्या.

त्यातुलनेने महापालिकेच्या ताब्यात सध्याच्या २५० आणि लवकरच केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या 50 इलेक्ट्रीक बसेस अशा ३०० बसेसचा ताफा असणार आहे. त्यामुळे दुप्पटीपेक्षा अधिक बसेस नाशिक शहरात धावणार असल्याने सार्वजनिक वाहतुकीकडे नागरिक वळणार असून खासगी वाहनांचा वापर कमी होणार असल्याचे एकूणच दिसून येत आहे.

आज तांत्रिक ट्रायलसाठी दहा बसेस या तपोवन बस स्थानकातून निघाल्या होत्या. यादरम्यान हेडऑफिसमध्ये असलेल्या आयतीएमएस प्रणालीमध्ये बसेसची नोंद करण्यात आली. कोणती बस कोणत्या स्थानकावर थांबली, किती वेळाने ती इच्छितस्थळी पोहोचली. याबाबतची माहिती घेण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com