नाशिक | Nashik

महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागाच्या लिपिकाला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी पकडले.

संजय पटेल असे संशयित लिपिकाचे नाव असून ताे घरपट्टी-नळपट्टी विभागात कार्यरत आहे. नळजाेडणी मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला हाेता.

मात्र पटेल याने ३५ हजारांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती.

त्यानुसार रंगपंचमीच्या दिवशी लिपिक पटेल याने १० हजारांची लाच घेतली. मात्र, सापळा रचलेलल्या पथकाने पटेल याला रंगेहाथ पकडले.