अँपद्वारे घरबसल्या मनपा बसचे तिकीट मिळणार

उद्यापासून सिटी बस नाशिककरांच्या सेवेत
अँपद्वारे घरबसल्या मनपा बसचे तिकीट मिळणार

नाशिक | Nashik

बहुचर्चीत नाशिक मनपाची बस सेवा (Nashik NMC Bus Service) उद्या (दि.8) पासून नाशिककरांच्या सेवेत दाखल होत आहे.

राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ex CM Devendra Fadnavis), पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा (Opening Ceremony) होणार असून आधूनिक तंत्रज्ञानचे वापर करुन तयार केलेल्या बसेसमध्ये नाशिककरांनी प्रवास करावा, असे आवाहन मनपा आयुक्त कैलाश जाधव (NMC Commissioner Kailash Jadhav) यांनी केले आहे.

आधुनिक बसचा आनंद नाशिककरांना मिळावा, म्हणून यासाठी विशेष अँपची (Special App) सोय करण्यात आली आहे. अँप डाऊनलोड केल्यावर अनेक सुविधा मिळणार असून घरबसल्या आपण तिकीट बुक (Online Ticket Booking) करु शकणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे बसचे लोकेशन, आपल्या जवळ असलेल्या थांब्याची माहिती देखील अँपवर मिळणार आहे. 250 थांब्यावर 9 रूटवर उद्यापासून 50 बसेस धावणार आहे.

या अँपलिकेशन मध्ये 1)वेअर ऑम आय 2) बस रुट 3) बुक माय टिकिट 4) व्हियु टिकिट 5) माय पास 6) माय फेवरेटस 7)फिड बॅक 8) हेल्प लाईन 9 ) अबाऊट अस असे मॉडयुलस उपलब्ध आहे. या द्वारे प्रवाशी मी कुठे आहे, मार्गावरील बस रुटची माहिती(Bus Route Information), मोबाईल वरुन टिकिट बुक करणे , पासेस काढणे (Passes) इ.प्रकारचे सोयी या मध्ये उपलब्ध आहेत.

नाशिक शहर बससेवा मनपामार्फत (Nashik City Bus Service) चालविणेकामी महासभेच्या धोरणात्मक निर्णयासाठी प्रस्ताव सादर करणेत आला होता.

त्यानुसार नाशिक शहरातील बससेवा जीसीसी तत्वावर महानगरपालिकेमार्फत चालविणेस तसेच सदर कामी स्वतंत्र कंपनी स्थापन करणेस महासभा ठराव (क्र. 91 दि.19/9/2018 अन्वये) मंजुरी मिळाली होती. यानुसार नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. नावाची कंपनी स्थापन करुन बससेवा सुरु होत आहे.

मे. ट्रॅव्हल टाईम कार रेंटल प्रा.लि. यांचे बसेसचे संचलन तपोवन आगार, पंचवटी येथून होणार आहे. तर मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा.लि. यांचे बसेसचे संचलन हे सिन्नर फाटा, नाशिकरोड येथील आगारातून होणार आहे. यावेळी महाव्यवस्थापक मिलींद बंड आदी पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

भविष्यात नियो मेट्रोला हाच लोगो

मनपा टप्प्याटप्प्याने एकूण 250 बसेस सुरू करणार असून उद्या पहिल्या ट्प्यात 50 बसेस सुरू होणार आहे. यामध्ये 30 बसेस सिएनजीवर चालणारे आहेत.

‘सिटीलींक’ कंपनीद्वारे (City link Company) सेवा पुरवीली जाणार असून त्यासाठी विशेष लोगो मागविण्यात आले होते. तर मनपा अभियंता चव्हाणे यांच्या मुलाने तयार केलेले लोगो फायनल झाले. हाच लोगो भविष्यात होणार्‍या नाशिक नियो मेट्रोसाठी देखील राहणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com