मनपाची बससेवा आता दिंडोरीपर्यंत

मनपाची बससेवा आता दिंडोरीपर्यंत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या बससेवेचा ( NMC Bus Services )हळूहळू विस्तार होत आहे. याचाच एक भाग म्हणून सिटीलिंकने ( Citilink )नाशिकरोड ते दिंडोरी बससेवा ( Nashikroad to Dindori Bus Services ) सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वे स्टेशनपासून थेट स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरीपर्यंत बससेवा उपलब्ध झाली आहे.

याशिवाय शहरातील काही मार्गावर देखील बसफेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी दिवाळीपासून संपावर आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाची बससेवा विस्कळीत झाली आहे. त्याचा फायदा मनपाच्या सिटीलिंकला होताना दिसत आहे.

प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सिटीलिंकने सिन्नर, त्र्यंबकेश्वरबरोबरच आता दिंडोरी मार्गावरदेखील सेवा सुरू केली आहे. नाशिकरोड येथून सोमवारी या सेवेचा प्रारंभ झाला. सकाळी 6 ते सायंकाळी 7 यावेळेत दर अर्ध्या तासाने या मार्गावर बसफेरी असेल. त्यामुळे नाशिक-दिंडोरी दरम्यान ये-जा करणारे विद्यार्थी व सामान्य नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. द्वारका, निमाणी, म्हसरूळ, तळेगांव या मार्गाने बस दिंडोरीकडे धावणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com