नमस्कार! नाशिक मनपा परिवहन महामंडळात आपले स्वागत; प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद

नमस्कार! नाशिक मनपा परिवहन महामंडळात आपले स्वागत; प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका परिवहन महामंडळ बसमध्ये आपले स्वागत. उपलब्ध असलेल्या आसनावर जाऊन बसा असे शब्द आपण नाशिकमधील बसेसमध्ये प्रवास करताना कानावर ऐकू येतात. नव्या-कोऱ्या बसमध्ये प्रवास करताना नाशिककर चांगलेच आनंदात दिसून येत आहेत. नियमित बसेसमध्ये वर्दळ असलेल्या नाशिकरोड भागातून सर्वाधिक प्रवाशांनी आज सकाळपासून प्रवास केला....

नमस्कार! नाशिक मनपा परिवहन महामंडळात आपले स्वागत; प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद
भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

नाशिकरोड डेपोमधून पाच तर तपोवन डेपोतून चार बसेस सकाळपासून वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. कालपासून हे ट्रायल सुरु आहे. पहिल्या दिवशी प्रवासीभाडे न आकारता नाशिककरांना मोफत प्रवास देण्यात आला.

आज सकाळपासून मात्र, तिकीटदराने भाडे आकारण्यात आले. मर्यादित भाडे, नव्याकोऱ्या बसेस, अत्याधुनिक धाटणी यामुळे आनंदाने नाशिककर प्रवास करू लागले आहेत. सकाळपासून ६०३ प्रवाशांनी मनपा बससेवेचा लाभ घेतला.

१० हजार ४० रुपयांचे उत्पन्न यावेळी मिळविण्यात आले आहे. यामध्ये मोबाईल तिकीट ट्रेन, तपोवन डेपो आणि नाशिकरोड डेपोतील उत्पन्नाचा समावेश आहे.

नाशिकरोड डेपोतून सर्वाधिक ७ हजार १८० रुपये मिळाले तर तपोवन डेपोमधून २ हजार ८६० रुपये मिळाले तर मोबाईलमधुन ५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com