ऑक्सिजन प्लांटसाठी मनपाकडूनच टाळाटाळ

उद्योजक दातीर यांचा आरोप
ऑक्सिजन प्लांटसाठी मनपाकडूनच टाळाटाळ

नवीन नाशिक | प्रतिनिधी

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी प्लांट उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षापासून ऑक्सीजन प्लांट साठी सर्व कागदपत्र मनपा नगररचना विभागात सादर करून देखील ऑक्सिजन व इतर गॅस रिफिलिंग प्लांट लावण्यासाठी हा विभाग परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप उद्योजक साहेबराव दातीर यांनी पत्रकार परिषदेत प्रसंगी केला...

सध्या नाशिक शहरामध्ये करोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहरामध्ये ऑक्सीजन चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याने ऑक्सिजन न मिळाल्याने बऱ्याच बाधीत रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सध्या मनपा प्रशासनातर्फे तसेच जिल्हा प्रशासनातर्फे नाशिककरांना ऑक्सिजन मिळावा याकरिता सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याची पाहणी करत असताना उद्योजकांना ऑक्सीजन प्लांट लावण्यासाठी आवाहन केले होते.

मात्र मनपाचाच नगररचना विभाग या गोष्टीला विरोध दर्शवत असल्याचा आरोप दातीर यांनी केला. यावेळी त्यांनी सांगितले की, नागपूर येथील विस्फोटक विभागाकडून अंबड औद्योगिक वसाहतीत गॅस प्लांट साठी परवानगी देखील मिळाली असताना गेल्या तीन ते चार वर्षापासून मनपाच्या नगररचना विभाग या प्लांट ला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे.

जर यापूर्वीच हा प्लांट सुरू झाला असता तर नाशिककरांना त्याची मोठ्याप्रमाणावर आज मदत मिळाली असती. मी प्रामाणिक पणे गुंतवणुक करून ही मला ऑकसीजन प्लॉन्ट साठी परवानगी न देता अन्याय केल्याची भावना दातीर यांनी म्हटले आहे

ऑक्सीजन प्लांटसाठी कोटयाावधी रुपयांची गुंतवणुक केली आहे. दिल्ली नोएडा येथुन टॅक आणला आहे. मनपाने तीन वर्षा पुर्वी परवाानगी दिली असती तर नाशकात आज रूग्णांना ऑकसीजन मिळाले असते. क्रित्येक रूगणांचे प्राण वाचले आहे.एक तर मनपा परवानगी मिळणार नाही असे पत्र देत नाही व परवानगी देत नाही. मनपाने परवानगी मिळणार नाही असे पत्र दिले तर मी शेजारच्या राज्यात ऑक्सीजन प्लान्ट सुरु करु शकेल, तसेच मनपाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.

साहेबराव दातीर, उद्योजक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com