गायक कलाकारांसाठी सुवर्णसंधी; 'निवेक आयडॉल - सिझन -२'ची घोषणा

गायक कलाकारांसाठी सुवर्णसंधी; 'निवेक आयडॉल - सिझन -२'ची घोषणा

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील गायक कलाकारांसाठी 'निवेक आयडॉल - सिझन -२' ही गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २९ मे २०२२ रोजी ही स्पर्धा होईल.

नाशिकमधील प्रतिष्ठित असलेल्या 'निवेक' (नाशिक इंडस्ट्रीज वेलफेअर सेंटर) यांच्या माध्यमातूनही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत निवेकचे सदस्य व जिल्ह्यातील इतर सर्व गायक कलाकार यांना सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक कलाकारांनी येत्या रविवार (दि १५) पर्यंत नावाची नोंदणी करावयाची आहे. स्पर्धेची पहिली ऑडिशन ऑनलाईन असेल. त्यानंतर दुसरी ऑडिशन,निवेक ऑडीटोरिअयम हॉल येथे द्यावी लागणार आहे.

विजेत्यांसाठी ट्रॉफी/ प्रशस्ती पत्रक/ व आयोजकांतर्फे विविध स्वरूपात पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत.

नोंदणीसाठी इच्छुकांनी ९१७५९१३७६८ / ९०४९५०८००० / ८३९००००१६८ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवेक कार्यकारणी तसेच आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कलेची अनोखी छाप पाडावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

No stories found.