...यामुळे नाशिक-पुणे प्रवास होणार सुखकर

...यामुळे नाशिक-पुणे प्रवास होणार सुखकर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) नेतृत्वात देशभरात रस्ते निर्मितीला चालना मिळून अनेक ठिकाणी वाहतुकीला सुसज्ज असे महामार्ग बनवण्यात येत आहेत...

आता नाशिक-पुणे महामार्ग (Nashik-Pune Highway) बाह्यवळण रस्ताही तयार झाला आहे. नारायणगावातून जाणारा पुणे बायपास (narayangaon bypass) हा पुणे ते नाशिकदरम्यानचा (Pune to Nashik) प्रवास सुखकर करेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटवर दिली आहे.

खेड ते सिन्नरदरम्यानच्या (Khed to Sinnar) नारायणगाव येथील बाह्यवळण रस्त्याचे काम 2016 ला सुरू झाले. सुमारे पाच किलोमीटर लांब आणि साठ मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018 मध्ये भूसंपादनाच्या कारणास्तव रखडले.

आता या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पुण्यातून (Pune) थेट नाशिक (Nashik) आणि मुंबईला (Mumbai) पोहोचणे आता सहज शक्य होणार आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com