
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) येत्या 18 मार्चला नाशिक (nashik) दौर्यावर येणार आहेत.
त्यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे (Gopinath Mundhe) यांच्या पुर्णाकृतृी पुतळ्याच्या उद्घाटनासह (Inauguration of the statue) विविध विकास कामांचे (Development works) उदघाटन होणार आहे. गडकरी नाशिक दौर्यावर येणार असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये (BJP workers) उत्साहाचे वातावरण पसरले आहे. नांदुर शिंगोट येथे उदय सांगळे यांच्या संकल्पनेतुन गोपीनाथ मुंढे यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.
या उदघाटन सोहळ्यास श्री. गडकरी यांच्याबरोबरच मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Former Minister Balasaheb Thorat) प्रमुख अतीथी म्हणुन उपस्थीत राहणार आहेत. पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या मार्गदर्शनाखली हा भव्य कार्यक्रम होत आहे. तसेच खा.हेमंत गोडसे (MLA Hemant Godse) यांच्या संकल्पनेतुन नाशिकला गोल्फ क्लबे येथे लष्करी शस्रांचे भव्य प्रदर्शन भरवीण्यात येणार असुन त्याचेही उदघाटन श्री गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच श्री गुरुजी रुग्णाालयच्या स्व. डॉ. म..वि. गोविलकर रुग्णसेवा सदनाचे लोकार्पन शनिवारी (ता.18) सायंकाळी साडे पाचला श्री गडकरी करणार आहेत. रंभा चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक गिरीश दामानी यावेेळी उपस्थीत राहणार आहेत. असे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर, सचीव प्रवीण बुरकुले यानी सांंगीतले.