निसाकामुळे उस उत्पादन वाढेलः बोरस्ते

निसाकामुळे उस उत्पादन वाढेलः बोरस्ते

निफाड । प्रतिनिधी | Niphad

निसाकामुळे (NISAKA) शेतकरी (farmers) पुन्हा उस उत्पादनाकडे वळेल. त्यासाठी चांगला दर देण्याची गरज आहे.

शेतकर्‍यांनी दर्जेदार उस उत्पादन (Sugarcane production) करावे, त्यातून कारखाना यशस्वी सुरू राहील, असे प्रतिपादन निसाकाचे माजी चेअरमन माणिकराव बोरस्ते (Former Chairman of Nisaka Manikrao Boraste) यांनी केले. तर रासाकाची (RASAKA) यापूर्वीची पुनरावृत्ती निसाकाबाबत होऊ नये अशी अपेक्षाही त्यांंनी व्यक्त केली.

निफाड सहकारी साखर कारखान्याचा (Niphad Cooperative Sugar Factory) नूतनीकरण सोहळा आज शनिवार (दि.24) सायंकाळी शेकडो शेतकरी, कामगार, सभासदांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात पार पडला. दिंडोरीप्रणित श्री. स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाचे प्रमुख गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते विविध मशिनरी व प्रवेशद्वाराचे पूजन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे म्हणाले की, निसाकाला गतवैभव आणण्यासाठी कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल. भविष्यात कारखाना यशस्वी सुरू राहील, अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

शिवगिरी महाराज म्हणाले की, ज्या ठिकाणी सोन्याचा धूर निघत होता तिथे अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. पण, आज इथे लक्ष्मीची पावले पुन्हा उमटली आहेत. बी.टी. कन्स्ट्रक्शनमुळे आता परिसरात पुन्हा नंदनवन निर्माण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. खासदार हेमंत गोडसे (MP Hemant godse) म्हणाले की, साखरेची निर्यात समाधानकारक होत नव्हते. त्यामुळे साखर कारखाने (Sugar factory) अडचणीत आले होते. परंतु, केंद्र सरकारने (central government) इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol production) चालना दिल्यामुळे येणार्‍या काळात निसाकाची चाके निश्चितच यशस्वीपणे फिरत राहतील.

निसाकाचे माजी चेअरमन भागवत बाबा बोरस्ते म्हणाले की, खासदार हेमंत गोडसे यांनी निसाका सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेतकर्‍यांनी कच्च्या मालाचा पुरवठा करावा. माजी आमदार अनिल कदम यांनी सांगितले की, भावना आणि व्यवहारामध्ये सांगड झाली नाही. मात्र, बी.टी. कन्स्ट्रक्शनच्या कामाची गुणवत्ता बघता शेतकरी, कामगार, सभासदांच्या चुली पेटत्या राहतील असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.

यावेळी निसाकाचे माजी चेअरमन प्रल्हाद पाटील कराड, भागवत बाबा बोरस्ते, हिरालाल सानप, पंडितराव सांगळे, उद्धव कुटे, लक्ष्मण टर्ले, रोहिदास कदम, माजी आमदार अनिल कदम, राजेंद्र सोनवणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सतीश मोरे, निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, भाऊलाल तांबडे, बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शनचे संचालक बी.टी. कडलग, अष्टलक्ष्मी शुगरचे संचालक सागर गोडसे, शेरझाद पटेल, जिल्हा बँकेचे प्रशासक अरुण कदम, डी.बी. मोगल, दीपक बोरस्ते आदी उपस्थित होते. सुहास सुरळीकर यांनी सूत्रसंचालन केले. निसाकाचे व्यवस्थापक बी.एन. पवार यांनी आभार मानले. याप्रसंगी परिसरातील कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते.

बारा वर्षानंतर संजीवनी

निसाकाच्या नूतनीकरण सोहळ्यामुळे परिसराला तब्बल बारा वर्षानंतर नव संजीवनी मिळणार आहे. यामुळे उस उत्पादक, कामगार, सभासदांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निसाका सुरू होणार असल्याने स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगाराला देखील चालना मिळणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com