
वणी | Vani
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत के. आर. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वणी येथे आज दि.२८ फेब्रुवारी रोजी 'निर्भय कन्या अभियान' (Nirbhay Kanya Abhiyan) संपन्न झाले. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आर. एन. भवरे यांनी निर्भय कन्या अभियान कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून प्रास्तविक केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. प्रसाद व मराठी विभाग प्रमुख डॉ. आढाव यांनी या कार्यक्रमा विषयी आपले विचार मांडले.
विद्यार्थी विकास अधिकारी (Student Development Officer) एस. बी. लोखंडे यांनी निर्भय कन्या अभियानाचा उद्देश स्पष्ट करून विद्यार्थिनींनी शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर कशा प्रकारे सक्षम झाले पाहिजे याविषयी मत व्यक्त केले. प्रथम सत्रात वैशाली जाधव यांनी विद्यार्थिनींनी व्यक्तिमत्व विकास कसा करावा तसेच आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करावा, यावर व्याख्यान देऊन व्यक्तिमत्वाबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात अॅड. पुनम गांगुर्डे यांनी विद्यार्थिनींना महिलांविषयी असणारे कायदे (Laws) समजावून सांगितले. तर, तिसऱ्या सत्रात डॉ. प्रज्ञा पाटील यांनी महिला आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एल. शिंदे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. एस. एस. प्रसाद, डॉ. के. आर. आढाव डॉ. पी. एम. कांबळे डॉ. कैलास सलादे तसेच, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.