निफाड तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणार

आमदार दिलीप बनकर यांचे प्रतिपादन
निफाड तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणार

दिक्षी। वार्ताहर Dikshi-Niphad

सन 2004 ते 2009 या कालावधीमध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या कालावधीमध्ये तत्कालीन शासनाच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी (Fund) उपलब्ध करून तालुक्याचा सर्वागीण विकास साधला. त्यानंतर 10 वर्ष सातत्याने नागरिकांच्या संपर्कात राहून शक्य होईल तेवढी विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Rashtravadi Congress Party) माध्यमातून करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला.

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) त्याच कामाची पावती म्हणून निफाडकरांनी पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचे सोने करत महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) माध्यमातून निफाड तालुक्याचा (Niphad Taluka) सर्वागीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी केले आहे.

वडाळी नजिक येथे विविध विकासकामांच्या शुभारंभाप्रसंगी बनकर बोलत होते. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर काही महिन्यातच करोनाने थैमान घातले. त्यामुळे प्रथम आरोग्य यंत्रणेकडे लक्ष केंद्रित करुन ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा (Healthcare) उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital), ऑक्सिजन जनरेशन प्लांट (Oxygen Generation Plant) अशा विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीची तरतूद केली.

कारसूळ सह परिसरातील गावांची कादवा नदीवर (Kadva River) पुल व्हावा ही सातत्याने मागणी असल्याने सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात कादवा नदीवर पुलासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पुढील एक वर्षात पुलाचे काम पूर्ण करणार आहे. याबरोबरच नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) धरणाच्या वाढीव गेटचा प्रस्ताव तसेच निफाड, रानवड साखर कारखाना (Ranwad Sugar Factory), निफाड ड्रायपोर्ट (Niphad Dryport), तालुक्यातील रस्ते, सायखेडा (Saykheda) चांदोरी (Chandori) येथील गोदावरी नदीवरील पुल (Godavari River), साकोरे-उंबरखेड मधील कादवा नदीवरील पुल अशी विविध विकासकामे लवकरच मार्गी लागणार आहे.

तसेच वडाळी नजिक ते पद्मावती रस्त्यासाठी 15 लाख रु., वडाळी नजिक ते खंडेराव महाराज मंदिर रस्त्यासाठी 5 लाख रु. अहिल्याबाई होळकर सभागृहासाठी 10 लाख रु. आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शिवाजी ढेपले, देवराम मोगल, सुभाष होळकर, राजेंद्र डोखळे, मोतीराम झाल्टे, सुरेश मोरे, कैलास होळकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी तानाजी बनकर, सुरेश खोडे, बाळासाहेब बनकर, संजय मोरे, रामभाऊ माळोदे, सुभाष कराड, सोमनाथ मोरे, दीपक बोरस्ते, पं.स. सभापति सुलभा पवार, गणेश बनकर, विश्वास मोरे

सागर कुंदे, भूषण धनवटे, विष्णुपंत होळकर, रमेश झाल्टे, बाळासाहेब झाल्टे, भाऊसाहेब फटांगडे, गोकुळ झाल्टे, मधूकर मोगरे, मंगेश होळकर, ग्रामपंचायत उपसरपंच विनायक घोलप, सदस्य बाळासाहेब घोलप, विजय होळकर, दिपाली झाल्टे, मंगला मोगरे, वैशाली कडाळे, वैशाली कराटे, कानिफनाथ कराटे, ग्रामविकास अधिकारी सोनाली सांगळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com