
निफाड | प्रतिनिधी | Niphad
तालुक्यात रविवार (दि.१२) रोजी पारा (Mercury) अचानक घसरल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये (Grape Growers) चिंता निर्माण झाली आहे. ५.५ अंशापर्यंत खाली आलेला पारा शेतकऱ्यांची (Farmers) डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे...
आठवड्यापासून दिवसा ऊन (Hot) तर रात्री थंडी (Cold) असे वातावरण होते. तर उन्हामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये साखर उतरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण (Environment) होते.
मात्र, रविवार (दि.१२) रोजी तापमान अचानक ५.५ अंशावर (Degrees) आल्याने परिपक्व झालेल्या द्राक्ष मण्यांमधील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.तसेच वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागांमध्ये रात्रीच्या वेळी शेकोट्या करुन काळजी घेतली जात आहे.
आठवड्यातील तापमान असे
६ फेब्रुवारी : ९.८
७ फेब्रुवारी : ८.३
८ फेब्रुवारी : ७.५
९ फेब्रुवारी : ८.५
१० फेब्रुवारी : ९.५
११ फेब्रुवारी : ७.२
१२ फेब्रुवारी : ५.५