निफाड शिक्षकांनी दिला साडे चार लाखांचा निधी

आरोग्य विभागाला दिली मदत
निफाड शिक्षकांनी दिला साडे चार लाखांचा निधी
USER

निफाड | Niphad

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य विभागाची सुरु असलेली कसरत पाहून निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी जवळपास चार लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी जमवून आरोग्याच्या दृष्टीने 40 सेमी फॉवलेर बेड, 250 फेस शिल्ड, 10 नेब्युलायझर सेट 30 व्हेपोरायझर सेट आरोग्य विभागाला साहित्य वाटप उपलब्ध करून दिले.

करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अपुरी बेड संख्या, आणि हतबल झालेली आरोग्य यंत्रणा यामुळे आपण आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य करावे असे भावनिक विचार करून तालुक्यातील शिक्षक बांधवानी सामुदायिक निधी जमा केला.

निधी जमा करतांना कोणालाही सक्ती करण्यात आली नाही जमा झालेल्या निधीतून तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्राना प्रत्येकी चार बेड, करोना काळात सर्वेक्षण आणि इतर कामे करणाऱ्या आशा वर्कर यांना फेस शिल्ड, नेबूलाईझर सेट, व्हॅप्युरायझर सेट यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुक्यातील शिक्षक बांधव उपस्थित होते. शिक्षकांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com