निफाड : रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक

निफाड : रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Abhay Puntambekar

निफाड । प्रतिनिधी Niphad

करोना विषाणूमुळे अनेकांचे उद्योगधंदे, नोकर्‍या बंद झाल्या. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे गोरगरीब जनता रोजच्या जेवणाचीसुद्धा व्यवस्था करू शकत नाही. गरीब लोकांना तसेच करोना विषाणूने बळी पडलेल्या लोकांना 'निफाडची विकासधारा ग्रुप' तसेच गावातील सर्व नागरिकांच्या माध्यमातून काही देता येईल का या विचारातून निफाडची विकासधारा या ग्रुपच्या माध्यमातून एक छोटीशी मदत म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिराप्रसंगी निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, नगरसेवक अनिल कुंदे, देवदत्त कापसे, संदीप जेऊघाले, बापू कुंदे, विक्रम रंधवे, शांताराम कर्डिले, जगदीश कुंदे तसेच निफाडची विकासधारा ग्रुप, विश्वेश्वर ग्रुप, स्वराज्य ग्रुप तसेच गावातील विविध मंडळे, स्वयंसेवी संस्था, विविध संस्थांचे पदाधिकारी व युवक उपस्थित होते.

करोना काळात तरुणांनी रक्तदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून हे शिबिर यशस्वी केल्याने निफाड नगरपंचायत पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी निफाडची विकासधारा या ग्रुपचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com