आजपासून चार दिवस निफाड बंद
नाशिक

आजपासून चार दिवस निफाड बंद

विनामास्क फिरणार्‍या नागरिकांकडून ५०० रु. दंडाची आकारणी करण्यात येणार

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी Niphad

शहरात दिवसागणिक करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आज गुरुवार दि.९ ते रविवार दि.१२ पर्यंत निफाड शहरातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्व व्यवहार पुर्णपणे बंद राहणार असल्याचे नगरपंचायतीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

तसेच शहरात विनामास्क फिरणार्‍या नागरिकांकडून ५०० रु. दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. संचारबंदी काळात दुकाने उघडी दिसल्यास सदर दुकान चालकांकडून दंड वसूल करुन ही दुकाने बंद करण्यात येणार आहे.

तसेच मातोश्री जसोदाबाई सोनी विकास ट्रस्टच्या वतीने शहरातील प्रत्येक दोन वार्डात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काढा वाटप करण्यात येत असल्याचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार यांनी म्हटले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com