चोरट्यांकडून नऊ दुचाकी हस्तगत; युनिट १ ची मोठी कारवाई

चोरट्यांकडून नऊ दुचाकी हस्तगत; युनिट १ ची मोठी कारवाई
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी Nasik

शहर पोलीस दलातील युनिट १ (Nashik City police unit 1) ने मोठी कामगिरी करत दुचाकी चोरट्यांच्या टोळीकडून नऊ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. (nine two wheeler s seized) गेल्या अनेक दिवसांपासून पंचवटी (Panchvati) परिसरातून अनेक दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडत होत्या.

News Update | न्यूज अपडेट
...अखेर 'तो' मृतदेह 22 दिवसांनी सापडला

गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी करताना दोघा चोरट्यांच्या ताब्यात घेतले आहे. मोईन अन्वर खान, ( वय २४) ,रा. साईदर्शन अपार्टमेंट, पखाल रोड नासर्डी नदीजवळ व तौफीक नसीर खान ( वय २४ ) रा. मसोली जि. बाराबंकी, उत्तरप्रदेश अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत....

दरम्यान, गरेज मध्ये काम करत असताना दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकींच्या डुप्लिकेट चाव्या (Duplicate keys) बनवून संधी मिळतच संबंधितांच्या घरासमोरून रात्री बेरात्री गाड्या चोरण्याचे या संशयितांनी काबुल केले आहे तसेच त्यांच्याकडून अकरा चोरीची कबुली मिळाली.

पोलिसांनी संशयितांकडून एक सुझुकी अॅक्सेस (Suzuki Access), ५ अॅक्टिव्हा मोपेड (Activa Moped), सुझुकी अॅक्सेस मोपेड, एक रॉयल इनफिल्ड बुलेट अशा नऊ दुचाकी ताब्यात घेतल्या. दोन दुचाकी भंगारमध्ये दिल्याचे संशयितांनी सांगितले.

News Update | न्यूज अपडेट
Video : एकूणच असा होता शाळेचा पहिला दिवस...

पोलिस उपायुक्त संजय बारकुंड (DCP Sanjay Barkund), सहाय्यक आयुक्त वसंत मोरे (ACP Vasant More), निरीक्षक विजय ढमाळ (PI Vijay Dhamal) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संशयितांकडून ९ दुचाकी हस्तगत केल्या आहे. तर ११ दुचाकी चोरीची कबुली दिल्याचे निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले.

गुन्हे शाखेतील मुक्तार शेख यांना पंचवटीतील सेवाकुंज सोसायटीत चोरटे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी या भागात सापळा लावला होता.

News Update | न्यूज अपडेट
लाचखोर पीएसआयची रवानगी सेन्ट्रल जेलमध्ये

पोलीस प्रवीण कोकाटे, प्रदीप म्हसदे, धनजंय शिंदे, रावजी मगर, नझीम पठाण, मोतीराम चव्हाण, समाधान पवार, मुक्तार शेख यांच्या पथकाने सापळा लावून दोघांना काळ्या रंगाच्या अॅक्टीव्हासह पकडले. उपनिरीक्षक विष्णू उगले तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.