रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणी मुख्य संशयितास अटक

या प्रकरणी एकूण नऊजण जेरबंद ; ८५ इंजेक्शन ताब्यात
रेमडेसिवीरच्या काळाबाजार प्रकरणी मुख्य संशयितास अटक

पंचवटी | Panchavti

पंचवटी परिसरातील क.का.वाघ कॉलेज समोरील परिसरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार उघडकीस आला होता.

या प्रकरणात गेल्या तीन चार दिवसात एकूण ८ संशयितांनाअटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी(दि१९) यातील मुख्य सुत्रधाराच्या पालघर जिल्ह्यातून मुसक्या आवळण्यात आल्या. या संशयिताच्या घरातून तब्बल, ६३ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे.

पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालयासमोर रेमडेसिविर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करणाऱ्या तीन नर्स सह एका मेडिकल बॉयला अटक केली होती. या प्रकरणात यापूर्वी एकूण २२ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले होते व एकूण संशयीत हे ८ झाले होते.

या प्रकरणी मुख्य संशयिताचां माग पोलीस काढत होते. मुख्य संशयित सिद्धेश अरुण पाटील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच पालघर येथील कमला लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, बोईसर, इंजेक्शन बनवणाऱ्या कंपनी काम करीत असल्याची महिती समोर आली होती.

त्यानुसार संशयीत सिद्धेश यास पालघर येथील उमरोळीतील राहत्या घरातून ताब्यात घेत त्यांचेकडून ६३ रेमेडीसिव्हर इंजेक्शन जप्त त्यातील ६२ इंजेक्शन विना लेबल तर १ लेबल सहित जप्त करण्यात आले.

या प्रकरणात आजपर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे ८५ रेमडीसीविर इंजेक्शन हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com