रावळगाव शिवारात साडेनऊ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

रावळगाव शिवारात साडेनऊ लाखांचा गुटख्याचा साठा जप्त

मालेगाव । Malegoan

अवैधरित्या विक्रीसाठी रावळगाव शिवारातील शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये पिकअप वाहनात ठेवलेला 9 लाख 54 हजार रूपये किंमतीचा विमल व इतर गुटखा पुड्यांचा साठा तसेच साडेपाच लाखाची पिकअप व्हॅन असा सुमारे 15 लाख 4 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल विशेष पोलीस पथकाने छापा टाकून जप्त केला. हा गुटखा बाळगणार्‍या दत्ता जिभाऊ वडक्ते (21, रा. रावळगाव) यास पोलिसांनी अटक केली आहे.

शहर व तालुक्यात अवैधरित्या गुटख्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरीकांतर्फे केल्या जात आहेत. या संदर्भात रावळगाव शिवारात वायगाव रोडवरील आदिवासी वस्तीनजीक असलेल्या एका शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये लाखो रूपयांचा गुटखा पुड्यांचा साठा अवैध विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती.

यासंदर्भात जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधिक्षक खांडवी यांच्या सुचनेनुसार विशेष पोलीस पथकाचे उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, हवा. वसंत महाले, विकास शिरोळे, संदीप राठोड, पंकज भोये, भुषण खैरनार यांच्या पथकाने रात्री 8 वाजेच्या सुमारास दत्ता वडक्ते यांच्या शेतातील पोल्ट्री फार्मलगत सापळा लावून गुटखा पुड्यांनी भरलेली पिकअप वाहन क्र.एम.एच.-19-सी.वाय.-0192 हे आढळून आले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात सुमारे 9 लाख 54 हजार रूपये किंमतीचा विमल गुटखा पुड्या व इतर प्रतिबंधीत गुटखा पुड्यांचा साठा आढळून आल्याने पोलिसांनी तो पिकअप वाहनासह जप्त केला. याप्रकरणी दत्ता वडक्ते याच्याविरूध्द वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com