घोटीत आजपासून नऊ दिवस जनता कर्फ्यु

घोटी पोलीस ठाणे येथे बैठक : व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला निर्णय
घोटीत आजपासून नऊ दिवस जनता कर्फ्यु
File Photo

घोटी । Ghoti

इगतपुरी तालुक्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असून तालुक्यातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 300 च्या वर गेली आहे.

याच अनुषंगाने घोटीत आढावा बैठक घोटी पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवून पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर 9 दिवसीय जनता कर्फ्यु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हॉस्पिटल व मेडिकल सुविधा व्यतिरिक्त संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

इगतपुरी तालुक्यातील घोटी ही व्यापारासाठी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते या ठिकाणी तालुक्यासह ठाणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याकारणाने शहरातील गर्दी कमी होत असतांना दिसत नसल्याने तातडीने बैठक आयोजित केली होती.

घोटी पोलीस ठाण्यातील आयोजित कोरणासंदर्भातील आढावा बैठकीत आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे घोटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यासह ग्रामपालिका पदाधिकारी व व्यापारीवर्ग यांची बैठक संपन्न झाली.

त्या ठिकाणी बैठकीत १७ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत ९ दिवस जनता कर्फ्यु चे म्हणजे संपूर्ण शहर कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने आमदार हिरामण खोसकर, यांनी व्यापारीवर्गाला घोटी हॉटस्पॉट बनू नये म्हणून आपण उपाय योजना राबवित असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण योग्य नियोजन करून बंद ठेवल्यास साखळी तोडू शकतो असे मार्गदर्शन केले. त्यानंतर व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

आज पासून घोटी शहर दवाखाने व मेडिकल वगळता संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. कुणीही दुकाने उघडे ठेवल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. घोटी येथे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय गरजेचा असल्याने 9 दिवसीय जनता कर्फ्युचे आवाहन करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com