निमाचे कार्यालय सुरू; प्रश्न मात्र लोंबकळलेच
निमाचे कार्याल सुरू प्रश्न मात्र लोंबकळलेच
नाशिक

निमाचे कार्यालय सुरू; प्रश्न मात्र लोंबकळलेच

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

निमाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची शंका व्यक्त करुन, त्यांच्या स्वॅब तपासण्या करण्यात येत असलेल्याचे कारण देऊन रविवारपासून (दि. 2) चौदा दिवसांसाठी निमा कार्यालय सेल्फ क्वारंटाइन करण्यात आलेले होते.

ते निमा कार्यालय शुक्रवारी (दि.14) स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी उघडण्यात आले. रविवारपासून कार्यालय नियमित वेळेत सुरू करण्यात आले असले तरी निमातील सत्तेचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( दि. 14) सकाळी 'निमाचे कार्यालय उघडण्यात आले. कार्यालय संपूर्ण सॅनिटाइज करण्यासह परिसराची स्वच्छता दुपारी तीन वा. करण्यात आली. शनिवारी (दि.15) पूर्वीच्याच कार्यकारिणीने 'निमा' त ध्वजारोहण केले.

यावेळी विश्वस्त मंडळासह त्यांनी नियुक्त केलेल्या काळजीवाहू कार्यकारी समितीने देखिल या सोहळ्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. रविवारपर्यंतच्या गेल्या चौदा दिवसांपासून सुरु असलेला 'निमा' तील सत्तेचा तिढा सुटलेला नसल्याचे चित्र आहे.

14 दिवस निमा कार्यालय सेल्फ क्वारंटाईन करण्यातून काय साध्य झाले? किती लोक करोना बाधित सापडले? याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही. ही परत सुरक्षिततेची उपाय योजना होती की शह-काटशहचा प्रकार होता असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे. मात्र राजकारणाच्या व्यासपीठावर उद्योजकांना गृहीत धरल्या बद्दल त्यांच्यात ऩाराजीचा सूर उमटत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com